सत्यमेव जयते

ग्रामपंचायत मानूर, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

☝🏼 माझ्या गावा बद्दल ..

☝🏼 माझ्या गावा बद्दल ..

मानूर गावाची माहिती:-
मानुर हे गाव कळवण तालुक्यापासून १ कि.मी अंतरावर पच्छिम दिशेला बसलेले आहे. जिल्ह्यापासून सरासरी ८२ कि.मी आहे. ग्रामीण भागातील जनतेचा शेती ह्या व्यवसाया बरोबर पर्यावरनाच सर्वांगीण विकास व्हावा ग्रामीण भागाचे व गोर गरिबांचे जीवनमान उंचवावे त्यांचा आर्थिक, सामाजिक व सौंस्कृतिक विकाससाठी गावाचे जास्त योग दान असते.
मानुर गाव कळवण नाशिक ह्या मुख्य रस्तावर टेकडीच्या पायथ्याशी बसलेले आहे. फार पूर्वी मनोहर ऋषी या टेकडीवर तपच्र्यासाठी बसले होते. त्यांचे नावावरून मनोहर पुढे अपभाषणे मानूर असे नाव झाले. मानोऱ्या टेकडी उंच आहे. शिवाय आजूबाजूस निसर्गरम्य दृष्य मनोहर दिसते.
गावाजवळ बेहडी व मार्कंडी नद्यांचा संगम आहे. संगमावर शिवालय (आनंदवन) आहे. मार्कंडी नदीच्या किनारी गोरक्षनाथाचे जागृत स्थान आहे. तसेच टेकडीच्या उत्तरेस जवळून गिरणा नदी वळसा घालून वाहते. हा परिसर पूर्वी ऋषी मुनींची तपोभूमी होती.

तसेच ग्रामदैवत हनुमंतराया मार्केंडेश्वर व परमपूज्य ब्रम्हलीन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रावण महिन्यात आठ दिवस व ग्रंथ दिंडी मिरवणूक व ग्रंथ वाचन व आठ दिवस पहाटे ५ वा काकड आरती व सायंकाळी ६ वा हरिपाठ तसेच महाराष्ट्रतील नामवंत कीर्तनकार बोलाविले जातात. व दररोज सायंकाळी ९ वाजता त्यांचे कीर्तन केले जातात. या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने अखंड हरीनाम सप्ताह परस्पर सहकार्याने कार्यक्रम केला जातो..
गावात शैक्षणिक प्रगती अग्रेसर असून गावात जि.प.ची १ते ४ पर्यंत प्राथमिक शाळा आहे. तसेच आश्रम शाळा असून १ते ७ पर्यंत पो.वे. आश्रमात ८ते १० वी पर्यंत सोय आहे. तेथे मुला मुलींचे स्वतंत्र वसतीगृह व ख्रिश्चन बोर्डिंग आहे. शिवाय शेतकी विद्यालय आणि विज्ञान शाखेचे कनिष्ट महाविद्यालय आहे. या सर्वसंस्थेमध्ये सुमारे ३००० विध्यार्थी अध्ययन करतात.
या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने व परस्पर सहकार्याने राहतात. गावात महिला मंडळ असून त्यांचा लघु उद्योग प्रगती पथावर आहे. तसेच गावात दर वर्षी महादेवाची यात्रा भरते. असे हे मानूर गाव आहे.
तसेच मानूर गावापासून कोल्हापूर फाटा ये १.५कि.मि. अंतरावर असुन. हे वस्तीवर कोल्या डोंगर हे पर्यटनस्थळे सारखे असल्याने त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी सुठ्ठी च्या दिवशी ट्रकिंग साठी युवा वर्ग जातात. या गावाची लोकसंख्या साधारपणे ५४४८ इतकी आहे. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेत मजुरी आहे. मुख्यता या गावात कांदा, मका , बाजरी, भुईमूग, गहू, सोयाबीन ,मिरची ,टमाटा . तूर, कोबी ईत्यादी पिके घेतली जातात.
येथील हवामान शेतीला अनुकूल आहे. त्यामुळे हे पिके घेतली जातात.
ग्रामपंचायतीची स्थापना:- सन १९६२
गावाजवळचे बसस्थानक :- कळवण,
गावात पोस्ट ऑफिस आहे.
गावचा पिन कोड ४२३५०१ हा आहे.
गावालत प्रमुख तीर्थस्थळे :- सप्तश्रृंगी गड, मार्कडेय डोंगर, महादेव मंदिर
तालुकापासुंचे गावाचे अंतर :- १ कि.मि.
जिल्हास्तरापासून गावाचे अंतर :- ८२ कि.मि.

आदिवासी लोकांचे कुलदैवत
डोंग-यादेव
नोव्हेंबर/डिसेबर महिन्‍यात नुकतचं सुरुवात झाल्‍यास आदिवासी बांधव या सणाची तयारी करतात.यामध्‍ये नोव्हेंबर/डिसेंबर महिन्‍यामध्‍ये दोन पोर्णिमा येतात. आणि पहिल्‍या पोर्णिमेला एक खांब जमिनीत गडला जातो. एक पुराण कथा माहिती असलेला माणुस हा त्‍या दिवशी एका जागेवर खा्ंब गाडला जातो. त्‍या वषियी त्‍या माणसाला सगळं माहिती असतं त्‍या खांबाच्‍या जागेला खळी म्‍हणुन नाव देतात. आणि त्‍या खांबाच्‍या शेजारी किंवा खांबाच्‍या कडापाशी पाच झेंडुची रोपे लावली जातात. त्‍या खांबाशी एक दिवा पण लावला जातो. तेथे तांदळाच्‍या पुजा टाकतो हा कार्यक्रम पहिल्‍या पोर्णिमेच्‍या आटोपली जात असे.

दुस-या दिवशी प्रत्‍येक घरातील एक व्‍यक्‍ती त्‍यात शेंगरी देव म्‍हणुन त्‍यात सामील होतो. सामील झाल्‍यानंतर त्‍या गावा शेजारी जे गाव असते त्‍या गावातील प्रत्‍येक घरोघरी जाऊन त्‍या घरांच्‍या अंगणात देवांची गाणी मोठया आवाजात गाणे गातात. व ते देव जोरजोरात नाचवितात म्‍हणजेज ब्रम्‍हदेवासारख्या अशा महान दैवतांचे गाणे लावणे व घराच्‍या अंगणात नाचणे सुरु असते. त्‍या घरातील जी कुंटुब चालवणिारी व्‍यक्‍ती असते की. ही अंगणशेत नाचणा-या व्‍यक्‍ती असतात. त्‍यांना पण देवाच्‍या नावाने मोठया आवाजात हाक मारावी लागते. हा कुंटुबप्रमुख नाचगाण्‍याच्‍या देवाच्‍या नावाने भिक्षेच्‍या स्‍वरुपात धान्‍य देतो. अशा प्रत्‍येक घरोघरी नाचुन जेवढे धान्‍य सायंकाळी पुन्‍हा माऊली म्‍हणेजच देव. आपला जो मुळ खांब गाडलेला असतो. त्‍या ठिकाणी दिवसभरातील गोळा केलेले धान्‍य आ‍णले जाते. तेथे झाडांच्‍या फांदया तोडुन त्‍यापासुन एक छोटेसे लाकडी घर तयार केलेले असते त्‍याला कठोर असे म्‍हणतात.त्‍या काठारामध्‍ये आठ दिवसांत जमा केलेले धान्‍य ठेवले जाते. नवव्‍या दिवशी मग पुन्‍हा पौर्णिमेला असते त्‍या पौर्णिमेला सर्व माऊल्‍या सायंकाळी ज्‍या डोंगराला आपला त्‍याला पण नांव दिले जाते.
गऊल पण गड आणि देऊळ असे त्‍याला देऊळ असे त्‍याला नांव दिले जाते. अशा डोंगरांच्‍या पायथ्‍याशी जाऊन त्‍या पौर्णिमेच्‍या रात्री किंवा तेवढया रात्रीपुरते राहावे लागते ज्‍या ठिकाणी माऊल्‍या असतात त्‍या रात्री वास्‍तव करतात. तेथे पुन्‍हा एक खांब गाडला जातो. तेथे पाच झेंडुची रोपे व झाडे लावली जातात मग त्‍याला तांदळांच्‍या पुंजा त्‍यात टाकाव्‍या लागतात पहाटेच्‍या वेळेस सर्व माऊल्‍या उठुन एकत्र येतात. सर्वाना ज्‍या डोंगराला आपला गऊळ असतो. त्‍या डोंगरावर चढावे लागते डोंगरावर असलेल्‍या देवाच्‍या मूतींची पाया पडतात यर्व माऊल्‍यांचे दर्शन झाल्‍यानंतर सर्व माऊल्‍यांचे दर्शन झाल्‍यावर सर्व माऊल्‍या एका रांगेनेच डोंगराच्‍या पायथ्‍याशी उतरतात. सर्व माऊल्‍याचे जे गाव असेल त्‍या गावाच्‍या शेजारी येऊन माऊल्‍याना जावे लागते. त्‍या खळीला धानी खळी असे म्‍हणून संबोधले जात असते.
थोड्याच वेळात तेथे बोकडाच बळी दिला जातो. कोबडचांचाही बळी दिला जातो. त्‍या पशुचा रक्‍ताचा एक किंवा दोंन थेंब या ठिकाणी दयावा लागतो. एखाघा नवीन व्‍यक्‍तीने बघितल्‍यास त्‍यांच्‍या मनात प्रश्‍न उद्भवतात की.बोकडासारख्‍या पशुंची आहुती घावीच लागते. काय रक्ताचा थेंब घावाच लागतो. काय.
हा कार्यक्रम आटोपल्‍यावर नतर दुस-या दिवशी पुन्‍हा ज्‍या ठिकाणी गावातील कोठार ज्‍या खळीवर असते. त्‍या खळीवर प्रत्‍येक घरोघरच्‍या माऊल्‍यांना उपस्थित रा‍हावे लागते आणि आठ दिवासाची जेवढे धान्‍य जमा केलेले असते. तेवढे धान्‍य हे प्रत्‍येक माऊलीला वाटले जाते.धान्‍य वाटपपचा कार्यक्रम आटोपल्‍यानंतर त्‍या दिवशी हा डोग-यादेव सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासी विभागात हा सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासी लोक मोठया प्रमाणात आनंदाने पार पाडतात आणि आनंद लुटतात. त्यामुळे आदिवासी विभागात हा सण एक महान सण म्‍हणुन साजरा केला जातो.
अशा प्रकारे देवाचा सण साजरा करतात.

मानूर ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
गावातील सुविधा

गावातील सुविधा

गावातील सुविधा
✅ पाणी पुरवठा: "हर घर जल हर घर नल " अन्वये कुटुंबाना स्वतंत्र नळ कनेक्शन
✅ आरोग्य : आरोग्य उपकेंद्र
✅ पिण्याचे पाणी : आर. ओ. ATM सुविधा
✅ हवामान केंद्र : हवामान विषयक माहिती गावात मोबाईलवर उपलब्ध
✅ शिक्षण : प्राथमिक शाळा 1 ते 4 जि. प. शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक
✅ महिला व बाल कल्याण : अंगणवाडी केंद्र - ४ आहेत
✅ दुरसंचार : दूरध्वनी सुविधा इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध
✅ सामाजिक सभामंडप : गावात सामाजिक सभामंडप 1 असून येथे सार्वजनिक कार्यक्रम विवाहसोहळा, वर्षश्राद्ध, धार्मिकविधी होतात
✅ स्मशानभूमि : स्मशानभुमी शेड, दशक्रिया विधी शेड उपलब्ध
✅ CCTV: गावात जागोजागी CCTV बसविले असुन त्याचा निगराणीत आहे
✅ व्यायाम शाळा : मानूर गावात स्वतंत्र व्यायामशाळा इमारत उपलब्ध
✅ सार्वजनिक क्रिडांगण : गावात क्रिकेट व इतर खेळण्यासाठी पब्लिक स्कूल मानूर स्वतंत्र मैदान.
✅ @आपले सरकार सेवा केंद्र - सेतू केंद्र @: मानूर गावात एक स्वतंत्र सेतू केंद्र दाखले व ऑनलाईन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सेंटर
✅ बचत गट : महिला बचत गट43 उत्पादक संघ बचत गट - 1
🏞️ @प्रेक्षणीय स्थळे@ चणकापूर धरण ता कळवण

🏞️ @प्रेक्षणीय स्थळे@ चणकापूर धरण ता कळवण

@धरणाची माहिती@
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ५१.१३ मी (सर्वोच्च)
लांबी : ३७०२.५ मी

दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : १०१.१९ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२३६.५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ७, (१२.१९ X ४.८८ मी)

पाणीसाठा
ओलिताखालील क्षेत्र
क्षेत्रफळ : १०.३१ वर्ग कि.मी.
क्षमता : ७९.९६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ७६.८६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १०३१ हेक्टर

कालवा
डावा कालवा
लांबी : २९.५ कि.मी.
क्षमता : ५.०४ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २००५५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १६०६८ हेक्टर

उजवा कालवा
लांबी : ३५.६८ कि.मी.
क्षमता : ६.६५ घनमीटर / सेकंद
बेहडी व गिरणा नदी गावाला लाभलेले .

बेहडी व गिरणा नदी गावाला लाभलेले .

बेहडी हि गावाच्या दक्षिणेस असेन त्या नदी पत्रा लागत पाणी पुरवठा विहीर आहे .त्यामुळे गावाला पाणी टंचाई भासत नाही...

नवीन कार्यक्रम/योजना

हिंदी दि चादर

17 Feb 2026 – 18 Feb 2026 ग्रामपंचायत मानूर
श्री गुरु तेग बहादुर साहेब जी ३५० वा शाहिदि समागम

हिंद दी चादर क्यों कहा गया? गुरु तेग बहादुर को ‘हिंद दी चादर’ यानी भारत की ढाल या भारत की चादर कहते हैं. इसकी कई वजह हैं.

मानूरला साकारली आठ फूट उंच पिंड

15 Feb 2026 आनंदवन आश्रम मानूर
महाशिवरात्री निमिताने मानूरला साकारली आठ फूट उंच पिंड

महाशिवरात्री निमिताने मानूरला साकारली आठ फूट उंच पिंड

मुख्यामंत्री समृदी पंचायतराज अभियान अंतर्गत कीर्तन

14 Feb 2026 मानूर
मुख्यामंत्री समृदी पंचायतराज अभियान अंतर्गत कीर्तन

मुख्यामंत्री समृदी पंचायतराज अभियान अंतर्गत कीर्तन

ग्रामपंचायत मानूर वसुली

14 Feb 2026 मानूर
ग्रामपंचायत मानूर वसुली

ग्रामपंचायत मानूर वसुली

गुरुदत्त मंदिर कळसासाठी भिक्षा फेरी

11 Feb 2026 मानूर कळवण
गुरुदत्त मंदिर कळसासाठी भिक्षा फेरी

गुरुदत्त मंदिर कळसासाठी भिक्षा फेरी

वनराई बंधारा

07 Feb 2026 मानूर बेहडी नदी पत्र
,पावसाळा संपल्यानंतर, नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून, बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते

,पावसाळा संपल्यानंतर, नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून, बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते

आरोग्य तपासणी

04 Feb 2026 ग्रामपंचायत मानूर आरोग्य उप केंद्र
तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे तुमचे आरोग्य; ते टिकवून ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. या सक्रिय भेटी डॉक्टरांना नियमित भेट देण्यापेक्षा बरेच काही देतात; संभाव्य आरोग्य समस्या टाळण्यासाठी, शोधण्यात आणि व्यवस्थापित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे तुमचे आरोग्य; ते टिकवून ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. या सक्रिय भेटी डॉक्टरांना नियमित भेट देण्यापेक्षा बरेच काही देतात; संभाव्य आरोग्य समस्या टाळण्यासाठी, शोधण्यात आणि व्यवस्थापित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

ग्रामपंचायत मानूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अभ्यासिका .

20 Nov 2025 मानूर
ग्रामपंचायत मानूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत अभ्यासिका उद्घाटन मा.ABDO सोनवणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मुलींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ग्रामपंचायत मानूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत अभ्यासिका उद्घाटन मा.ABDO सोनवणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मुलींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

श्रमदान स्वच्छता

31 Oct 2025 मानूर मारुती मंदिर
गावात मंदिर परिसर स्वच्छता करताना महिला मंडळ

गावात मंदिर परिसर स्वच्छता करताना महिला मंडळ

गप्पी मासे पैदास केंद्र

19 Oct 2025 – 10 Nov 2025 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मानूर ता कळवण जि नाशिक
गप्पी मासा हा सौंदर्य, उपयुक्तता आणि देखभाल या सर्व बाबतींत आदर्श पाळीव जलजीव आहे. तो डासांचे नियंत्रण करण्यासाठी तसेच अ‍ॅक्वेरियम सजावटीसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. थोडीशी काळजी घेतली तर गप्पी मासे वर्षभर आनंददायक सोबत देतात.

🐠 गप्पी मास्यांचा उगम:
गप्पी मासे मूळचे दक्षिण अमेरिकातील आहेत – विशेषतः व्हेनेझुएला, त्रिनिदाद, ब्राझील आणि गुयाना या देशांमध्ये आढळतात. मात्र आज हे मासे जगभरात अ‍ॅक्वेरियममध्ये पाळले जातात.

🌈 गप्पी मास्यांचे वैशिष्ट्ये:
छोट्या आकाराचे पण रंगीबेरंगी:
गप्पी मासे आकाराने सुमारे २ ते ५ सें.मी. लांबीचे असतात, पण त्यांच्या शरीरावर असलेले विविध रंग आणि छटा त्यांना अत्यंत आकर्षक बनवतात.

अत्यंत सहनशील:
हे मासे पाण्याच्या बदलत्या तापमानातही सहज जुळवून घेतात. त्यामुळे हे मासे पाळायला सोपे असतात.

सोपी पैदास (Breeding):
गप्पी मासे livebearers म्हणजे अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे त्यांची पैदास जलद आणि सोपी असते.

पाण्यातील डासांची अंडी खाणारे:
गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी व लार्वा खातात. म्हणूनच ते जैविक डास नियंत्रणासाठी उपयोगात आणले जातात.

🏠 घरच्या अ‍ॅक्वेरियममध्ये गप्पी मासे पाळण्याचे फायदे:
सौंदर्यवर्धन – अ‍ॅक्वेरियम आकर्षक दिसतो
देखभाल सुलभ – कमी खर्च व जागा लागते
मुलांसाठी शिक्षणात्मक उपयोग
मानसिक आरोग्यास लाभदायक – शांतता व आनंद मिळतो

🍽️ गप्पी माशांचे खाद्य:

फ्लेक फूड (सुकवलेले खाद्य)
जिवंत अन्न – डासांच्या अळ्या, ब्राईन श्रिम्प
भाज्या – पालक, मटार वगैरे बारीक करून

🧼 देखभालीचे नियम:
पाणी दर ७-१० दिवसांनी अर्धे बदला
पाण्याचा तापमान २४°C ते २८°C ठेवणे
टँकमध्ये झाडे व लपण्याची जागा ठेवावी
जास्त अन्न देणे टाळावे – त्यामुळे पाणी खराब होते

🧬 गप्पी मास्यांचे संकर (Hybrid Breeding):
गप्पी माशांचे विविध जाती, रंग व शेपटीच्या आकृतींसाठी शास्त्रीय संकर केला जातो. त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे गप्पी मासे उपलब्ध आहेत

🌿 पर्यावरणीय उपयोग:
गप्पी मासे नैसर्गिक डास नियंत्रणासाठी ग्रामीण भागात वापरले जातात. विशेषतः पाणी साठा असलेल्या ठिकाणी गप्पी सोडल्यास डेंग्यू व मलेरियाचा धोका कमी होतो.

🔚 निष्कर्ष:
गप्पी मासा हा सौंदर्य, उपयुक्तता आणि देखभाल या सर्व बाबतींत आदर्श पाळीव जलजीव आहे. तो डासांचे नियंत्रण करण्यासाठी तसेच अ‍ॅक्वेरियम सजावटीसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. थोडीशी काळजी घेतली तर गप्पी मासे वर्षभर आनंददायक सोबत देतात.

लोकसभागातून श्रमदान

04 Oct 2025 – 01 Nov 2025 स्मशानभूमी मानूर
लोकसभागातून श्रमदान स्मशानभूमी स्वच्छता

स्मशानभूमीचा अर्थ मृतदेह दफन करण्यासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी असलेली एक नियुक्त जागा आहे. ही एक अशी जागा आहे जिथे मृत व्यक्तींच्या अवशेषांचे आदरपूर्वक जतन केले जाते, आणि अनेकदा ती सार्वजनिक किंवा खाजगी स्मशानभूमी म्हणून ओळखली जाते. स्मशानभूमी ही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक श्रद्धा प्रतिबिंबित करणारी एक महत्त्वाची जागा आहे.
अर्थ: स्मशानभूमी म्हणजे मृत व्यक्तींच्या दफन किंवा अंत्यसंस्कारासाठी असलेली एक नियोजित जागा.

ओला आणि सुका कचरा

01 Sep 2025 – 15 Sep 2025 मानूर
ओला आणि सुका कचरा

ओला आणि सुका कचरा वेगळा करणे स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक आहे. ओला कचरा सेंद्रिय असून खतनिर्मितीसाठी वापरला जातो, तर सुका कचरा पुनर्वापरासाठी योग्य असतो. शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कचरा वर्गीकरणाला महत्त्व दिले जाते.

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्रीमती.एन.आर.खांडवी

श्रीमती.एन.आर.खांडवी

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्री.नितीन रमेश  पवार

श्री.नितीन रमेश पवार

ग्रा.पं.सदस्य

☎️ +91 7588619144

श्री.पवार साहेबराव निंबा

श्री.पवार साहेबराव निंबा

ग्रा.पं.सदस्य

सौ.गांगुर्डे सीमा अनिल

सौ.गांगुर्डे सीमा अनिल

ग्रा.पं.सदस्या

☎️ +91 9881349648

श्री.पवार परशुराम सुपडू

श्री.पवार परशुराम सुपडू

ग्रा.पं.सदस्य

☎️ +91 9420903916

श्री.चव्हाण योगेश गोविंदराव

श्री.चव्हाण योगेश गोविंदराव

ग्रा.पं.सदस्य

☎️ +91 8421829199

सौ. पिठे राणी अरुण सदस्या

सौ. पिठे राणी अरुण सदस्या

ग्रा.पं.सदस्य

☎️ +91 7770066958

सौ.पवार भूराबाई साहेबराव

सौ.पवार भूराबाई साहेबराव

ग्रा.पं.सदस्या

सौ.बोरसे पूनम उमेश

सौ.बोरसे पूनम उमेश

ग्रा.पं.सदस्या

☎️ +91 9850112011

श्री.बागुल रामदास बुधा

श्री.बागुल रामदास बुधा

ग्रा.पं.सदस्य

सौ.कुवर रंजना सुरेश

सौ.कुवर रंजना सुरेश

ग्रा.पं.सदस्या

☎️ +91 8007181218

श्री.पवार गोविंदा धर्मा

श्री.पवार गोविंदा धर्मा

ग्रा.पं.सदस्य

☎️ +91 8668929429

सौ.पिठे सोनाली सुनील

सौ.पिठे सोनाली सुनील

ग्रा.पं. सदस्या

☎️ +91 9405444326

GULAB POPATRAO AHER
संगणक परिचालक

GULAB POPATRAO AHER


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9999999999

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2011

कुटुंब856
लोकसंख्या5,448
पुरुष3,059
महिला2,389